Advertisement

पाणीकपात कटाप


पाणीकपात कटाप
SHARES

मुंबई - गेल्या एक आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची पाणीकपातीची समस्या दूर झाली आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचा पाणीसाठा 99 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांना महापालिकेला वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा करता येणार आहे. मागील महिनाभर पडत असलेल्या पावसामुळे तलावांची क्षमता 90 टक्के होती. मात्र आता ती 99 टक्के एवढी झाली आहे. याचा फायदा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. २०१५ च्या अपुऱ्या पावसामुळे मुंबईकरांना एक वर्षभर २० टक्के पाणी कपात सोसावी लागली होती. यंदा पावसाने जूनपासूनच जोरदार बॅटिंग केल्यामुळे मुंबईला वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा होऊ शकतो. तसंच बोरीवलीतील संजय गांधी उद्यानातील विहार तलावही तुडुंब भरले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा