Advertisement

Mumbai metro: मेट्रो ३ प्रकल्पात ८७ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण


Mumbai metro: मेट्रो ३ प्रकल्पात ८७ टक्के भुयारीकरणाचं काम पूर्ण
SHARES

कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो ३ या प्रकल्पाचं ८७ टक्के भुयारीकरणाचं आणि ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सोमवारी १.१० किलोमीटर भुयारीकरणाचा ३२ वा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम.एम.आर.सी.) तर्फे पूर्ण करण्यात आला. हे भुयारीकरण सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानक इतके आहे.

नागरिकांना कामामुळे होणारा त्रास कसा कमी होईल याचा विचार करून हे महत्वपूर्ण आणि अवघड काम पूर्ण करणं कौतुकास्पद आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार असून हे एक वरदान ठरणार आहे.

कृष्णा २ हे हेरेननेच बनावटीचे आणि भूगर्भदाब नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेले टनेल बोअरिंग मशीन १६ डिसेंबर २०१९ रोजी भूगर्भात सोडण्यात आले होते. या मशीनने सोमवारी २९५ दिवसात ७९१ रिंगच्या सहाय्याने अप-लाईन भुयारीकरण पूर्ण केले.

दादर मेट्रो स्थानक रहिवासी इमारती आणि व्यापारी आस्थापने यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मुंबई मेट्रो ३च्या स्थानकांपैकी एक महत्वाचे स्थानक आहे. त्यामुळे आजचा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करणं हे आव्हानात्मक होते. पॅकेज ४ मध्ये दादर सिद्धिविनायक आणि शितलादेवी या स्थानकांचा समावेश असून दादर स्थानकाचे ६१ टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण ९४ टक्के भुयारीकरण आणि ९५ टक्के खोदकाम पूर्ण झालं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा