Advertisement

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग २ महिन्यांत खुला होणार

समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग २ महिन्यांत खुला होणार
SHARES

मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका कार्यक्रमात दिली.

ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून येत्या दोन महिन्यात यातील शिर्डी ते नागपूर (Shirdi to Nagpur) हा महामार्ग सुरू होईल. समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

मुंबईतील भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरमधील मिहान एअरपोर्ट (Mihan Airport) यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करून आवश्यक माल संपूर्ण भारतात वेळेवर पोहोचवणे या मार्गाद्वारे शक्य होणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाविषयी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगांना चालना देण्यासाठी तसंच दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणत आहे. सध्याच्या काळात पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्हा या महामार्गाच्या बाजूला ग्रीन झोन उभा करत आहोत. तसंच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकदेखील सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरु होईल, असं त्यांनी सांगितलं.

महामार्गाविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘हा महामार्ग केवळ नागपूरपर्यंत न ठेवता, गोंदीया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त जिल्हा ही गडचिरोलीची ओळख पूसता येईल आणि विकासाची गंगा इथंही वाहू लागेल.’

हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई या १२ जिल्ह्यांना जोडणार आहे. या जलद मार्गाचा फायदा चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही अप्रत्यक्षपणे होणार आहे.



हेही वाचा

गोराई, मार्वेला रोप-वेद्वारे मेट्रो मार्ग 2A शी जोडणार

मुंबई महापालिकेत ९ वॉर्ड नव्यानं समाविष्ट करण्याला भाजपाचा विरोध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा