Advertisement

मुंबई महापालिकेत ९ वॉर्ड नव्यानं समाविष्ट करण्याला भाजपाचा विरोध

मुंबई महानगर महापालिकेची सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या अधिक ९नं वाढवून २३६ इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

मुंबई महापालिकेत ९ वॉर्ड नव्यानं समाविष्ट करण्याला भाजपाचा विरोध
SHARES

मुंबई महानगर महापालिकेची सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या अधिक ९नं वाढवून २३६ इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्या निर्णायाला आता भाजप नगरसेवक अभिजीत सामंत आणि राजश्री शिरवाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्याही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई पालिकेची सध्याची २२७ ही वॉर्डसंख्या ९नं वाढवून २३६ इतकी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वाढतं नागरीकरण लक्षात घेऊन मुंबईतही नगरसेवक संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळानं घेतली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ साल २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून ही वॉर्ड संख्या वाढविण्यात आली आहे. त्याला भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. 

साल २००१ मधील जनगणणेच्या आधारावर २२१ वरून नगरसेवकांची संख्या २२७ करण्यात आली होती. त्यानंतर साल २०११ च्या जनगणणेच्या आधारावर नगरसेवकांच्या संख्येत वाढ न करता प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते. त्याच आधारावर मुंबई महानगर पालिकेच्या साल २०१७ मधील निवडणूका पार पडल्या. मात्र, २०२०-२१ मध्ये कोविडाचा प्रादुर्भाव तसेच टाळेबंदीमुळे यंदाची जनगणणा होऊ शकली नाही. 

त्यासाठी नव्यानं जनगणणा करून प्रभाग रचनेसह सदस्यांची संख्येत वाढ होणं अपेक्षित आहे. मात्र असं असलं तरी साल २०२२ साठी २०११ च्या जनगणणेला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे ही प्रभाग रचना घटनाबाह्य आणि असंविधानिक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी या याचिकेतून केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा