Advertisement

मुंबईतील सर्वांत उंच मेट्रो पूल घेतोय आकार, वाहतूककोंडीपासून होणार सुटका

मुंबई (Mumbai) पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) आणि वरळी-शिवडी मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे.

मुंबईतील सर्वांत उंच मेट्रो पूल घेतोय आकार, वाहतूककोंडीपासून होणार सुटका
SHARES

मुंबई रेल्वेवरील सगळ्यात मोठ्या रेल्वे उड्डाणपुलाचे अर्थात शिवडी रेल्वे पुलाचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) सुरू केले आहे. (Maharashtra Railway Infrastructure Development Corporation)

मुंबई (Mumbai) पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) आणि वरळी-शिवडी मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. रेल्वे रुळांपासून सर्वांत उंच (२२ मीटर) असलेला हा पूल ऑगस्ट २०२३मध्ये पूर्ण होईल, असा दावा महारेलने केला आहे.

मुंबई पारबंदर प्रकल्पाचा मुक्तमार्गाकडे जाणारा जोडरस्ता या पुलाखालून जाणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यासाठी या जोडरस्त्याचे काम होण्यासाठी शिवडी रेल्वे उड्डाणपूल उभा राहणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प आणि वरळी-शिवडी मार्गाला जोडण्याचे काम हा पूल करणार आहे. नवी मुंबई येथून पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे अर्धा तास वेळ वाचणार आहे.

पुलासाठी आवश्यक गर्डरची बांधणी आणि पूल उभारताना विविध बांधकामे आणि केबल हटवण्याचे काम महारेलकडून यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. पुलाचे खांब उभारण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू आहे.

तसंच स्टील गर्डरचा वापर करण्यात येणार असल्याने त्यासाठी आवश्यक गर्डर फॅब्रिकेशनचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून MMRDA कडून सर्व मंजुरी मिळाली असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग आणि मुख्यालयातून येत्या दोन आठवड्यात मंजुरीची अपेक्षा आहे.

ये-जा करण्यासाठी एकूण चार मार्गिका

लांबी - ८२ मीटर

रुंदी - १८.०५ मीटर

उंची - २२ मीटर

एकूण खर्च - ४५ कोटी

काम पूर्ण होण्याचा कालावधी - १५ महिने



हेही वाचा

मुंबईकरांना लवकरच 2 नवीन सार्वजनिक स्विमिंग पूल मिळणार

महालक्ष्मी रेसकोर्स सायकल ट्रॅक सुरू होण्यास लागतील ६ महिने

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा