Advertisement

मुंबई सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जुलैमध्ये उघडण्याची शक्यता

भारत नगर रस्ता-वाकोला उन्नत मार्गाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

मुंबई सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जुलैमध्ये उघडण्याची शक्यता
SHARES

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जुलैपर्यंत पूर्ण होत आहे. या प्रकल्पातील काही टप्पे यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. उर्वरित काम वेगाने सुरू आहे.

भारत नगर रस्ता-वाकोला उन्नत मार्गाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १.४ किमी लांबीचा हा मार्ग आहे. जुलैपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यामुळं वाहतुक कोंडी सुटणार आहे. महानगर आयुक्त एस.व्ही.आर यांनी ही माहिती दिली आहे.

वाहतूककोंडीमुळे सांताक्रूझ ते चेंबूर गाठण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. मात्र या प्रकल्पामुळं फक्त अर्धा तासात हे अंतर कापणे शक्य होणार आहे.

सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उन्नत मार्ग असणार आहे.

सदर प्रकल्पाअंतर्गत बीकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत, तसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेत, त्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा