विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी तीन महिने बंद

 Sewri
विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी तीन महिने बंद
विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी तीन महिने बंद
विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी तीन महिने बंद
विद्युतदाहिनी दुरुस्तीसाठी तीन महिने बंद
See all

भोईवाडा - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य खात्यातर्फे ‘एफ/दक्षिण’ विभागातील भोईवाडा विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम 28 ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आलंय. हे काम तब्बल तीन महिन्यानंतर संपणार आहे. त्यामुळे तीन महिने ही विद्युतदाहिनी बंद राहणार आहे. आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि परिसरातील हॉस्पिटलमधील मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची दमछाक होणार आहे.

परळ पूर्व परिसरात केईएम, वाडिया, कर्करोगाचे टाटा रुग्णालय आणि क्षयरोग रुग्णालय आहे. मात्र टाटा आणि क्षयरोग रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि त्यांचे आजार गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना विद्युतदाहिनीत जाळले जाते. त्यामुळे आता मृतांच्या नातेवाईकांना दादर शिवाजी पार्क विद्युतदाहिनी, वरळी चंदनवाडी विद्युतदाहिनी आणि सायन रुग्णालयासोमर असलेल्या विद्युतदाहिनीत जावे लागणार आहे. भोईवाड्यातील विद्युतदाहिनीच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत या स्मशानभूमीत लाकडावरील अंत्यसंस्काराचा पर्याय उपलब्ध आहे, असे पालिकेच्या एफ - दक्षिण सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितलं.

Loading Comments