मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होणार नाही?

 Mumbai
मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होणार नाही?
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो - 7 चे काम सुरू आहे. हे काम मुख्यत्वे पश्चिम द्रुतगती मार्गावर सुरू आहे. या कामामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पण एमएमआरडीएने मात्र पावसाळ्यात पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहील असा दावा केला आहे.

एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे यांनी गुरूवारी मेट्रो - 7 च्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पायलिंग आणि पाइल कॅप्सची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. तर पावसाळ्यात पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, यादृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचेही आदेश दराडे यांनी दिल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आले आहेत.

Loading Comments