पाइपलाइनमुळे सुटणार पाणीप्रश्न

 Dahisar
पाइपलाइनमुळे सुटणार पाणीप्रश्न
पाइपलाइनमुळे सुटणार पाणीप्रश्न
See all

दहिसर - अशोक वन मधील सावरकरनगर इथल्या नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. त्यामुळे या परिसरात महापालिकेनं 48 इंच पाइपलाइन बसवण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइन बसवण्याच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आलीय. याबाबतीत नगरसेवक प्रकाश दरेकर यांना विचारलं असता पाण्याचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठा कमी होत होता. आता पाइपलाइन कमी बसवल्यामुळे इथल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

Loading Comments