मेट्रो-3 च्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा

  Mumbai
  मेट्रो-3 च्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा
  मुंबई  -  

  गिरगाव - कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाला असलेला गिरगावकरांचा विरोध अखेर मावळलाय. मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) आणि गिरगावकरांची सोमवारी गिरगावात एक बैठक झाली. "हे केवळ भू-तांत्रिक सर्वेक्षण असून प्रत्यक्षात बांधकाम सुरू व्हायला वर्षभराचा अवधी आहे.

  दरम्यानच्या काळात विस्थापितांच्या योग्य पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल," असं आश्वासन एमएमआरसीनं या बैठकीत दिलं. या आश्वासनानंतर गिरगावकरांनी आपला विरोध मागे घेतला.
  भू-तांत्रिक सर्वेक्षणाच्या कामाला हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती शिवसेनेचे नेते पांडुरंग सकपाळ यांनी दिलीय. एमएमआरसीनं पुनर्वसनाचा सविस्तर आराखडा तयार केलाय. हा आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय. या आराखड्यानुसार प्रत्येक विस्थापिताचं योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा दावा या वेळी एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी केला. तरी जोपर्यंत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मेट्रो-3 चं बांधकाम सुरू होऊ देणार नाही, या पुनरूच्चार सकपाळ यांनी केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.