मेट्रोतून उतरा, ओलातून घरी जा

 Pali Hill
मेट्रोतून उतरा, ओलातून घरी जा

मुंबई – गारेगार प्रवास करत मेट्रो स्थानकातून बाहेर पडल्यानंतर घर किंवा कार्यालय गाठण्यासाठी मेट्रो प्रवाशांना पुन्हा रिक्षा-टक्सी, बसच्या रांगेत उभं रहावं लागतं. आता मात्र मेट्रो प्रवाशांचा संपूर्ण प्रवास आरामदायी होणार आहे तो ओला टक्सीद्वारे. मुंबई मेट्रो-वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)नं यासाठी ओला टक्सीशी करार केला आहे. त्यानुसार घाटकोपर, साकीनाका आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे या तीन ओला झोन्स मेट्रो स्थानकाबाहेर तयार करण्यात आले आहेत. ओला झोन्समधून ओला टक्सीनं प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचता येणार आहे.

24 आक्टोबरपासून मेट्रो-ओला टक्सी सेवेला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे ही टक्सी सेवा अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणार आहे. प्रती किमी केवळ 3 रुपये असे दर यासाठी असणार असून शेयरिंगनेही हा प्रवास करता येणार आहे. तर पुढे संपूर्ण 11.4 किमीच्या मार्गावरील बाराही स्थानकावर ओला झोन्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएमओपीएलने दिली आहे.

Loading Comments