Advertisement

डिलाय रोडचा दुसरा भाग उघडण्यास विलंब

पावसामुळे काम करण्यास अधिकाऱ्यांना अवघड जात आहे.

डिलाय रोडचा दुसरा भाग उघडण्यास विलंब
SHARES

लोअर परेल इथल्या एन एम जोशी (NM joshi Marg) मार्गावर येणार्‍या डेलिसल ब्रिजचा दुसरी बाजू उघडण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. कारण तो जुलैपर्यंत तयार होणार नाही, असं चित्र सध्या आहे.

यापूर्वी, 1 जून रोजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) पुलाचा एक भाग उघडला आणि दुसरा जुलै अखेरीस उघडण्याची आशा वर्तवली होती. परंतु, पावसामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करणे अधिकाऱ्यांना अवघड जात आहे.

डेलिसल रोड पुलाच्या नुकत्याच उघडलेल्या भागावर पदपथ न बांधल्याबद्दल पालिकेला आधीच विरोध झाला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पालिकेने 20 जून रोजी डेलिसल रोड पुलाच्या दुस-या भागासाठी गर्डर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्डर पालिकेच्या अप्रोच रोडच्या दोन स्पॅनवर लाँच केला जाईल, त्यानंतर शटरिंग आणि मजबुतीकरणाचे काम केले जाईल. हे काम जूनमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते. पण आता त्याला विलंब लागण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा

वांद्रे स्टेशन स्कायवॉकद्वारे टर्मिनलशी जोडला जाणार

कोस्टल रोड कसा घेतोय आकार! पहा फोटो

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा