शौचालयाची दुरवस्था

 Chembur
शौचालयाची दुरवस्था
शौचालयाची दुरवस्था
See all

चेंबूर- यशवंत नगरमधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालीय. डागडुजी न झाल्याने शौचालयांचे दरवाजे पुर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर छतावरील पत्रेही तुटलेले असल्याने पावसाचे पाणी शौचालयामध्येच गळत आहे. या परिसरात शौचालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे रहिवाशांना सेल कॉलनी परिसरातल्या शौचालयात जावे लागत आहे. याचा त्रास महिला, लहान मुले आणि वृद्धांना होत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Loading Comments