Advertisement

पुणे विमानतळ एप्रिल ते मे दरम्यान १४ दिवस बंद : अधिकारी

विमानतळावरील उड्डाण सेवा एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस थांबवण्यात आली आहेत.

पुणे विमानतळ एप्रिल ते मे दरम्यान १४ दिवस बंद : अधिकारी
SHARES

पुणे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं की, विमानतळावरील उड्डाण सेवा एप्रिल आणि मे महिन्यात १४ दिवस थांबवण्यात आली आहेत. कारण धावपट्टीच्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे.

“भारतीय वायुसेनेकडून (IAAF) मिळालेल्या माहितीनुसार, धावपट्टीच्या फेरबदलाच्या कामांमुळे पुणे विमानतळ २६ एप्रिल २०२१ पासून मे ९ मे २०२१ पर्यंत १४ दिवस बंद राहणार आहे.

लोहेगावचे पुणे विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या मालकीच्या संरक्षण भूमीवर कार्यरत आहे. तर मागील वर्षी २६ ऑक्टोबर रोजी या भागात दुरुस्ती सुरू झाली.

“पुण्याहून वाढती रहदारी लक्षात घेऊन एएआयच्या पुणे विमानतळानं दोन तळघर आणि तळ मजल्याच्या वरच्या तीन स्तरांसह बहु-स्तरीय कार पार्किंग (एमएलसीपी) वर काम सुरू केलं आहे. यामुळे केवळ विमानतळ सुविधांमध्येच भर पडणार नाही तर प्रवाशांना अधिक सोईस्कर होईल, 'असं भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, पुणे विमानतळावरील उड्डाणं फक्त दिवसाच चालतात तर दुरुस्तीचे काम रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान चालणार.

विमानतळ संचालक म्हणाले की, दुरुस्तीची सोय करण्यासाठी टेक ऑफ आणि लँडिंगसह रात्रीची प्रत्येक उड्डाण सेवा दिवसभर पसरली गेली. याचा अर्थ असा की रात्रीसाठी निर्धारित सुमारे १० फ्लाइट सेवा दिवसाच्या वेळेत चालवल्या जातील.

पुणे विमानतळ त्यांच्या टर्मिनलवरून विशेषत: पश्चिम आशियाच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणं उड्डाण घेतात. अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, उड्डाण वाहतुकीत वाढ झाल्यानं धावपट्टीचा विस्तार करताना नवीन टर्मिनल बांधण्याची गरज आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा