Advertisement

मुंबई विमानतळाचं नाव बदलाल तर खपवून घेणार नाही, शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा

अदानी कंपनीला मुंबई विमानतळाचं नाव बदलण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचा इशारा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

मुंबई विमानतळाचं नाव बदलाल तर खपवून घेणार नाही, शिवसेना, राष्ट्रवादीचा इशारा
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे हक्क अदानी समुहाने विकत घेतले आहेत. मात्र असं असलं तरी अदानी कंपनीला मुंबई विमानतळाचं नाव बदलण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचा इशारा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) दिला आहे.

मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समुहाच्या हाती गेल्यानंतर कंपनीकडून विमानतळ परिसरात ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या लावण्यात आल्या होत्या. हे समजताच संपप्त झालेल्या शिवसैनिकांनी (shiv sena) व्हिआयपी गेट नंबर ८ आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर लावण्यात आलेला कंपनीच्या नावाचा बोर्ड लाठ्यांनी तोडला.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं असताना अदानी विमानतळ नावाचे बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत. तर अदानी कंपनीने जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अदानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना 'शिवसैनिकांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. शिवसेना सत्तेत असली तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. कुणी मालकी हक्क दाखवून ब्रँडिंग करत असेल. प्रचार करत असेल तर असले प्रकार सहन करणार नाही. काल जे झालं तेच पुढंही होत राहणार’, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शिवसैनिकांच्या कृत्याचं समर्थन केलं.

तर, अदानी समूहाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे (mumbai airport) शेअर्स GVK कडून विकत घेतल्याने त्याची मालकी अदानी यांच्याकडे गेली. याचा अर्थ असा नाही की त्यांनी विमानतळाचं नाव बदलून स्वतःचं नाव द्यावं. व्यवस्थापन अदानी यांच्याकडे असले तरी विमानतळाला नाव देण्याचा अधिकार त्यांना नाही.

अदानी समुहाची चूक झाली असून व्यवस्थापन वा मालकी अदानी समुहाची असल्याचे ते लिहू शकतात पण मुख्य नाव त्यांना बदलता येणार नाही. विमानतळाचे नाव बदलल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अदानी समुहाने यापुढे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी अदानी समुहाला झापलं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा