Advertisement

Exclusive: झोपडपट्टीवासीयांची चांदी! 'एसआरए'त मिळणार ३०४ चौ. फुटाचं घर

आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांना जिथं २६९ चौ. फुटाचं घर मिळतं होतं तिथं आता त्यांना थेट ३०४ चौ. फुटाचं घर मिळणार आहे. शुक्रवारी २१ सप्टेंबरला राज्य सरकारनं यासंबंधीची अधिसूचना जाहीर केली आहे.

Exclusive: झोपडपट्टीवासीयांची चांदी! 'एसआरए'त मिळणार ३०४ चौ. फुटाचं घर
SHARES

मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी मोठी खूशखबर आहे. आतापर्यंत झोपडपट्टीवासीयांना जिथं २६९ चौ. फुटाचं घर मिळतं होतं तिथं आता त्यांना थेट ३०४ चौ. फुटाचं घर मिळणार आहे. शुक्रवारी २१ सप्टेंबरला राज्य सरकारनं यासंबंधीची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता झोपडपट्टीवासीयांना आणखी मोठं घर मिळणार असल्यानं त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बाब असणार आहे.


आधी २२५ चौ. फुटाचं मोफत घर

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी तसंच झोपडपट्टीवासीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारनं झोपडपट्टी पुनर्विकास योजना आणली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणा (एसआरए)ची स्थापना केली. त्यानुसार 'एसआरए'च्या माध्यमातून आतापर्यंत लाखो झोपडपट्टीवासीयांना इमारतीत मोफत घर देण्यात आली आहेत. 'एसआरए'च्या नियमानुसार झोपडपट्टीवासीयांना २२५ चौ. फुटाचं मोफत घर देण्यात येत होतं. त्यानंतर झोपडपट्टीवासीयांकडून आणखी मोठ्या घराची मागणी करण्यात आली.




अध्यादेश जाहीर

या मागणीनुसार २२५ चौ. फुटावरून 'एसआरए'तील घराचं क्षेत्रफळ वाढवून २६९ चौ. फूट करण्यात आलं. हा निर्णयही झोपडपट्टीवासीयांसाठी दिलासादायक ठरला. त्यातच राज्य सरकारनं झोपडपट्टीवासीयांना आणखी मोठं घर देण्याची घोषणा केली. किमान ३०० चौ. फुटाचं घर देण्याची ही घोषणा होती. धारावी पुनर्विकास योजना आणि इतर विशेष प्रकल्पात ३०० चौ. फुटाची घर दिली गेल्यानं झोपडपट्टीवासी देखील ३०० चौ. फुटाची मागणी करत होते. त्यानुसार राज्य सरकारनं ३०० चौ. फुटाचं घर देण्याची घोषणा केली होती. आता प्रत्यक्षात ३०४ चौ. फुटाचं घर देण्याचा निर्णय घेत अखेर यासंबंधीचा अध्यादेश राज्य सरकारनं जाहीर केला आहे.


धोरणात बदल

बृहन्मुंबई क्षेत्राच्या सुधारित प्रारूप विकास योजनासह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ अर्थात मुंबईच्या विकास आराखड्याला नुकतीच राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या आराखड्यात ३३ (१०) च्या धोरणात अर्थात 'एसआरए' योजनांच्या धोरणात बदल सुचवले होते. त्यानुसार धोरणात बदल करत राज्य सरकारकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.


काम सुरू होण्याची प्रतीक्षा

या अधिसूचनेत ३३ (१०) अंतर्गत पुनर्वसीत घरांसाठी २५ चौ. मीटरएेवजी यापुढे २७.८८ चौ. मीटर क्षेत्रफळ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच यापुढे 'एसआरए'अंतर्गत झोपडीधारकांना २७.८८ चौ. मीटरचं अर्थात ३०४ चौ. फुटाचं घर मिळणार आहे. तर 'एसआरए' योजना मंजूर झाली आहे, पण अद्यापपर्यंत काम सुरू झालेलं नाही, त्या 'एसआरए' योजनांना नव्या तरतुदींचा लाभ मिळणार आहे हे विशेष.



हेही वाचा-

Good News! म्हाडा रहिवाशांना मिळणार मोठं घर!!

२०० कोटींची बँक गॅरंटी २० कोटींवर! 'एसआरए' अजूनही बिल्डरच्या प्रतिक्षेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा