Advertisement

कामकाज सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील १३, ४४८ उद्योगांकडून अर्ज

कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला राज्यातील १३ हजार ४४८ उद्योगांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत.

कामकाज सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील १३, ४४८ उद्योगांकडून अर्ज
SHARES

कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारला राज्यातील १३ हजार ४४८ उद्योगांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, यातील ६४ उद्योजक मुंबईतील असल्याचं सांगितलं जात आहे. महानगरातील मोठे भाग सध्या लॉकडाऊनच्या स्थितीत आहेत. अलीकडेच आलेल्या एका अहवालात नमूद केलं आहे की, लॉकडाऊन १८ मे पर्यंत लागू राहिल. असं म्हणतात की, महाराष्ट्रातील ३ हजार १८६ इंडस्ट्रिजनी आतापर्यंत काम सुरू केलं आहे.   

महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या अर्जापैकी नाशिकमधून २ हजार ६५५, औरंगाबादमधून २ हजार ३१०, पुण्यातून १ हजार ७४८, कोल्हापूरमधून १ हजार २१० आणि नागपुरातून १ हजार १८३ अर्जांचा समावेश आहे. उद्योग मालकांनी त्यांच्या पत्राद्वारे हे प्रमाणित केलं आहे की, ते सामाजिक अंतर आणि मजुरांना पुरेसे संरक्षण यासह उच्च अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील.

असं म्हटलं जातं की, आतापर्यंत ६९ हजार कामगारांनी कामासाठी अर्ज केला आहे. परंतु जवळपास ३ लाखांच्या आसपास कामगारांची आवश्यक्ता असल्याचं सांगितलं जातंय. आतापर्यंत कामगारांपैकी कुणीही पॉझिटिव्ह आढळलं नाही. असं म्हणता येईल की कामगारांच्या चाचमीबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं (MIDC) वाहनांच्या पाससाठी ७ हजार ०८१ विनंत्या प्राप्त केल्या आहेत. त्यापैकी केवळ २ हजार ०६९ मंजूरी देण्यात आली आहे. हे स्पष्ट आहे की अधिकारी उद्योग आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात विचार करत आहेत.

मुंबईसारख्या शहरातील काही भाग अजूनही सील आहे. अजूनही काही भागांवर हॉटस्पॉटचा शिक्का कायम आहे. याचा अर्थ असा आहे की मेच्या मध्यापर्यंत कुठलेही व्यवसाय सुरू होणार नाहीत. मे पर्यंत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेता, चाचणी क्षमता वाढवणं गरजेचं आहे.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा