Advertisement

मेट्रो ३ च्या ट्रॅकवर स्विस मशीनचा वापर

मेट्रो ३ च्या ट्रॅकवरील कंपन नियंत्रणासाठी एमएमआरसीद्वारे स्विस मशीनचा वापर केला जाणार आहे.

मेट्रो ३ च्या ट्रॅकवर स्विस मशीनचा वापर
SHARES
मेट्रो ३ च्या ट्रॅकवरील कंपन नियंत्रणासाठी एमएमआरसीद्वारे स्विस मशीनचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो ३ ने मुंबईकरांचा भुयारी प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एमएमआरसीने स्विस कंपनी मे. सोनविले-निर्मित मशीन च्या सहाय्याने हाय व्हायब्रेशन अटेन्युएशन बुटेड ट्वीन स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. ही ट्रॅक यंत्रणा अद्ययावत असून स्लीपर बॉक्सची निर्मिती वडाळा येथे शुरू आहे. अशा प्रकारचे आणखी एक मशीन लवकरच उपलब्ध होणार आहे.

 भारतात अशा प्रकारचे ट्रॅक्स प्रथमच वापरण्यात येत आहेत. सर्व साधारण मेट्रो ट्रॅक्सची २२ व्हीडीबी इतकी कंपन शोषण क्षमता असते. मात्र, स्लीपर बॉक्समुळे ट्रॅक्सची कंपन शोषण क्षमता अधिक कमी होणार आहे. संपूर्ण प्रकल्पाला २ लाख १ हजार आणि सहाशे इतके स्लीपर ब्लॉक्स लागणार आहेत. अशा प्रकारची २ मशीन्स महिन्याला १२ हजार स्लीपर ब्लॉक्सची निर्मिती करतील.

याबाबत एमएमआरसीचे (प्रकल्प) संचालक एस. के. गुप्ता म्हणाले की, कंपनांची परिणामकारकता कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी ही पद्धत सर्वोत्तम आहे. आवश्यकतेप्रमाणे योग्य वेळेत स्लीपर बॉक्सची निर्मिती करण्यासाठी ही एकूण प्रक्रिया मे. सोनविले यांच्या स्विस तज्ज्ञांच्या देखरेखी खाली पार पडत आहे.हेही वाचा-

कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार

मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे- मुंबई पोलिसRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा