मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणं सक्तीचं

आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व दुकानदारांना सीसीटिव्ही कॅमरे बसवणे सक्तीचे असल्याचे आदेश काढलेले आहेत.

मुंबईतल्या सर्व दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणं सक्तीचं
SHARES

मुंबईत लाँकडाऊननंतर भूरट्या चोरांचा उच्छाद मांडला आहे. या चोरांची ओळख पटवून त्यांना अटक करून हे प्रमाण रोखण्यासाठी मुंबई  आता नवी शक्कल लढवली आहे. मुंबईतल्या सर्व दुकानदारांना आपल्या दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे असल्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

हेही वाचाः- गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

कोरोना संक्रमण काळात लाँकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर जनतेच्या संरक्षणासाठी पोलिस रस्त्यावर उतरले होते. मुंबईच्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी असल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दीही ओसरली होती. मात्र कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारने  टप्या टप्याने सर्व अनलाँकडाऊन करण्यास सुरूवात केली. त्यामुळे दिवळीच्या सणाला खरेदीसाठी नागरिक आता रस्त्यावर गर्दी करू लागल्यानंतर सोनसाखळी चोर आणि घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी पून्हा उच्छाद मांडला आहे. अनेकदा गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोलिसांचे सीसीटिव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी अडचणी येतात. या आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व दुकानदारांना सीसीटिव्ही कॅमरे बसवणे सक्तीचे असल्याचे आदेश काढलेले आहेत.

हेही वाचाः-  विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका

मुंबईत या पूर्वी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ६ हजारहून अधिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र मुंबईतल्या काही चिंचोळ्या गल्यांमध्ये आजही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरांना पकडणे अवघड जाते. मुंबईतल्या सर्व दुकानात जर सीसीटिव्ही कॅमेरे लावले, तर चोर चोरी करण्यापूर्वी विचार करतील. आणि चोरी झालीच तरी आरोपींची ओळख पटवण्यास देखील मदत होईल. त्याच बरोबर मुंबईतल्या सर्व गल्यांमध्ये असलेल्या दुकानात सीसीटिव्ही लागल्यास पोलिसांना इतर गुन्ह्यांतही त्या दुकानतल्या सीसीटिव्हीचे चित्रीकरणाचा उपयोग होईल. उदा. अपघात, सोनसाखळी चोरी, मारहाण, या सारख्या गुन्ह्यांमध्ये रस्त्यावर होणाऱ्या गुन्ह्यांवरही वचक बसवता येईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा