Advertisement

गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

गृहमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट, चर्चांना उधाण
SHARES

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या चकमक उडत असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्पालांना भेटून आल्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नसला, तरी ही भेट राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. त्यामागे अन्य कोणतंही कारण नव्हतं, असं सांगण्यात आलं आहे. 

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

त्यावर सत्ताधारी पक्षांतून आक्षेप घेण्यात आला. राज्यपालांनी एका आरोपीला सहानुभूती दाखवण्यापेक्षा पीडित कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवली असती, तर ते योग्य ठरलं असतं, असं मत अल्पसंख्याक कार्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलं होतं. 

हेही वाचा- अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांची पदयात्रा

तर, दुसऱ्या बाजूला अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्य याबाबत योग्यती काळजी घेण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कारागृहातील आरोपीला वा कैद्याला भेटण्यास नातेवाईकांना मनाई करण्यात आलेली आहे. तरीही अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलायचं असल्यास ते कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन बोलू शकतात. याच पद्धतीने ते वकिलांशीही फोनवर बोलू शकतात, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. 

त्याआधी अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी भाजपचे मुंबईतील आमदार राम कदम यांनी मंगळवारी हुतात्मा चौकापासून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढत गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांना गोस्वामींच्या सुटकेसाठी निवेदन दिलं. 

(maharashtra home minister anil deshmukh meet governor bhagat singh koshyari)

हेही वाचा- सुटकेसाठी अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा