Advertisement

अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांची पदयात्रा

राम कदम यांनी मंगळवारी हुतात्मा चौकापासून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढत गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आणि त्यांना गोस्वामींच्या सुटकेसाठी निवेदन दिलं.

अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांची पदयात्रा
SHARES

इंटिरियर डिझायनर अर्णब गोस्वामी यांच्या आत्महत्याप्रकरणी तुरूंगात असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी भाजपचे मुंबईतील आमदार राम कदम आता रस्त्यावर उतरले आहेत. राम कदम यांनी मंगळवार १० नोव्हेंबर रोजी हुतात्मा चौकापासून मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढत गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची भेट घेतली आणि त्यांना गोस्वामींच्या सुटकेसाठी निवेदन दिलं. 

अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. सध्या अर्णब गोस्वामी (arnab goswami) यांच्या रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेवरून भाजप नेते सध्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. एवढंच नाही, तर या राजकीय नाट्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील उडी घेतली आहे. 

हेही वाचा- सुटकेसाठी अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव

राम कदम यांनी देखील राज्यपालांना भेटून अर्णब यांना पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्याची विनंती केली होती. सोबतच कुठल्याही परिस्थितीत अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जाणारच असा पवित्राही राम कदम (ram kadam) यांनी घेतला होता. 

महाराष्ट्रात रावणराज सुरू असून अर्णब गोस्वामी यांना हेतूपरस्सर, चुकीच्या पद्धतीने झालेली अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. एवढंच नाही, तर ठाकरे सरकार (thackeray government) राज्यात आणीबाणी लादत असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना राम कदम यांनी केला.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आम्ही हुतात्मा चौक ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढत होतो. परंतु पोलिसांनी मध्येच आम्हाला अडवत आम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही थांबलो नाही, कारण अर्णबच्या पाठिशी देशातील संपूर्ण जनता आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून आम्ही अर्णब गोस्वामींच्या सुटकेच्या मागणीचं निवेदन दिलं. आम्ही पोलिसांचा आदरच करतो, परंतु अर्णब यांना पोलिसांनी मारहाण का केली, त्यांना चुकीची वागणूक का दिली? असे प्रश्न आम्ही गृहमंत्र्यांना विचारले, त्यांच्या जीवाला धोका असून अर्णब यांच्या केसालाही धक्का लागल्यास त्यांच्या पाठिशी देशातील जनता असल्याचंही आम्ही सांगितलं, असं राम कदम म्हणाले. 

(bjp mla ram kadam meet maharashtra home minister anil deshmukh over arnab goswami arrest)

हेही वाचा- अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा