Advertisement

संसदेची नवी इमारत टाटा बांधणार, जिंकलं ८६२ कोटींचं कंत्राट

संसदेच्या या नवीन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी ८६१.९० कोटी रुपयांचं हे कंत्राट टाटा कंपनीला मिळालं आहे.

संसदेची नवी इमारत टाटा बांधणार, जिंकलं ८६२ कोटींचं कंत्राट
SHARES

Tata Projects Limited नं भारतीय संसदेच्या (New parliament building) नव्या इमारतीचं कंत्राट मिळवलं आहे. देशाची शान असलेली भव्य इमारत आता जुनी झाली आहे. संसदेची ऐतिहासिक इमारत ९२ वर्षांची झाल्यानं आता नवीन इमारत बांधायच्या हालचाली काही वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात टाटा समूहानं बाजी मारली आहे.

संसदेच्या या नवीन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी ८६१.९० कोटी रुपयांचं हे कंत्राट टाटा कंपनीला मिळालं आहे. भारताची संसद इमारत खूप वर्षांची झाली असून मागील काही काळापासून ही इमारत नवीन बांधण्याविषयी सरकारचा विचार सुरू होता.

दिल्लीत मोठा पाऊस झाला की ही इमारत गळते. जुन्या पद्धतीच्या अंतर्गत रचनेमुळे अनेक भागांमध्ये आणि संसदेच्या पॅसेजमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करता येत नाही. इंटरनेटच्या जमान्यात अनेक भागांमध्ये साधी मोबाईलची रेंज मिळणंही दुरापास्त होतं. वीज व्यवस्थेसाठी बांधकामात फेरफार करणं शक्य नसल्यामुळे अपुऱ्या व्यवस्थेपोटी कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येतात.

संसदेच्या या नवीन इमारतीचं काम या पावसाळी अधिवेशनानंतर तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर मागील महिन्यात सरकारनं यासाठी तीन कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या होत्या. यामध्ये Larsen & Toubro, Tata Projects आणि Shapoorji Pallonji & Company या तीन कंपन्या शॉर्टलिस्ट केल्या होत्या.

दरम्यान, नवीन इमारतीसाठी सरकारला या संसद भवनाच्या आसपास जागा शोधावी लागणार आहे. ब्रिटिशांनी ही इमारत बांधताना आसपास मोठ्या प्रमाणात जागा सोडली होती. मात्र कालांतरानं या जागेवर मोठ्या प्रमाणावर इमारती बांधल्या गेल्यानं आता या नवीन इमारतीसाठी सरकारला जागा शोधावी लागणार आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय