Advertisement

ठाणे-मुंब्रा बायपास २ महिन्यांसाठी बंद!

ठाणे-मुंब्रा बायपासवर खड्डेच खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. या रस्त्याला जोडणारा ब्रिजही धोकादायक झाला आहे. या ब्रिजखालून मध्य रेल्वे जाते. ही बाब लक्षात घेता रस्ता आणि ब्रिजच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

ठाणे-मुंब्रा बायपास २ महिन्यांसाठी बंद!
SHARES

ठाणे-मुंब्रा बायपास मार्ग सोमवारी १६ एप्रिलपासून एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल ६० दिवस म्हणजेच २ महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरूस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १६ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता २ महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.


कुणाला त्रास?

सलग २ महिने रस्ता बंद राहणार असल्याने प्रवासी-वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईतून ठाणे, कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्यांना आणि ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना याचा होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.


कारण काय?

ठाणे-मुंब्रा बायपासवर खड्डेच खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. या रस्त्याला जोडणारा ब्रिजही धोकादायक झाला आहे. या ब्रिजखालून मध्य रेल्वे जाते. ही बाब लक्षात घेता रस्ता आणि ब्रिजच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.


कुठल्या मार्गावर जड वाहतूक?

या दुरूस्तीच्या कामासाठी किमान २ महिन्यांचा कालावधी लागणार असल्यानं दोन महिन्यांसाठी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. हा मार्ग बंद राहणार असल्यानं ठाण्यात येण्यासाठी जड वाहतूक एेरोली मार्गे पूर्व द्रुतगती मार्गावर वळवण्याचा वा शीळफाटामार्गे कल्याणवरून भिवंडीला वळवण्याचा पर्याय वाहतूक विभागाकडे असणार आहे.


पार्किंगसाठी ट्रक टर्मिनल

तर चार चाकी, तीन चाकी, दुचाकी चालकांना जुना मुंब्रा गावचा रस्ता ठाण्यात येण्या-जाण्यासाठी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जी वाहनं दिवसा प्रवास करू शकत नाहीत, त्यांना पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसंच मनपाच्या ट्रक टर्मिनलच्या रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याचा वाहतूक विभागाचा विचार असल्याचंही समजत आहे.



हेही वाचा-

पारसिक बोगद्याजवळ महिलांच्या डब्यावर दगडफेक, दोघी जखमी

मुंबई विमानतळाचा मुख्य रन वे ६ तास बंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा