• मुंबई विमानतळाचा मुख्य रन वे ६ तास बंद
SHARE

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज अांतरराष्ट्रीय विमानतळाचा मुख्य रन वे तब्बल ६ तास बंद राहणार आहे. त्यामुळे या ६ तासांमध्ये मुख्य रन वे वरून एकाही विमानाचं उड्डाण होणार नाही किंवा एकही विमान या रन वे वर उतरणार नाही.


कुठल्या वेळेत बंद

मुंबई विमानतळावरील मुख्य रन वे ९ आणि १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या दरम्यान रन वे वरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. छत्रपती शिवाजी महाराज अांतरराष्ट्रीय विमानतळ एकमात्र विमानतळ आहे, जिथं केवळ एका रन वे वरून दररोज ९३५ विमान उड्डाण घेतात. हा एक विश्वविक्रम आहे.कुठल्या कारणासाठी बंद?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य रन वे वर प्रचंड प्रमाणात रबर जमा झाला आहे. विमान लँडिंग करताना विमानाच्या चाकांचं रन वे सोबत घर्षण होतं. तेव्हा रबराचे अवशेष रन वे वर जमा होतात. या अवशेषांचा थर रन वे वर जमा झाल्याने तो दूर करण्यासाठी रन वे बंद करण्यात येणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला देखील रन वे या कामासाठी बंद करण्यात आला होता.


दुसरा रन वे सुरू

या दरम्यान दुसरा रन वे नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या रन वे चा नेहमीच्या तुलनेत जास्त वापर होणं अपेक्षित असलं, तरी या ६ तासांमध्ये मोठ्या प्रमाणात विमानाचं वेळापत्रक बदण्याची आणि काही विमानांचं उड्डाण रद्द होण्याची शक्यता आहे.


माहिती कक्षाशी संपर्क

विमान उड्डाणाच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घ्यायची असल्यास विमानतळवरील माहिती संपर्क कक्षाशी संपर्क साधता येऊ शकेल.हेही वाचा-

नशेचा नवा अंमल 'डुकूका', मुंबई विमानतळावर ८ जणांना अटक

पोलिसांनी 'लोडर' बनून चोरांना पकडलं, कार्गोतील मोबाईलचोरांचा पर्दाफाशसंबंधित विषय
ताज्या बातम्या