Advertisement

मुंबई विमानतळाची विक्रमी झेप, नोंदवला लँडिंग-टेक आॅफचा विश्वविक्रम

विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावरुन २४ तासांमध्ये ९६९ विमानांनी यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग केलं. हा एक जागतिक विक्रम असून मुंबई विमानतळाने या अचाट कामगिरीने स्वत: चाच विक्रम मोडीत काढला आहे.

मुंबई विमानतळाची विक्रमी झेप, नोंदवला लँडिंग-टेक आॅफचा विश्वविक्रम
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाने २४ तासांत सर्वाधिक विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ करण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे. विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावरुन २४ तासांमध्ये ९६९ विमानांनी यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग केलं. हा एक जागतिक विक्रम असून मुंबई विमानतळाने या अचाट कामगिरीने स्वत: चाच विक्रम मोडीत काढला आहे.


मोडला स्वत: चा विक्रम

मुंबई विमानतळाने २४ तासांमध्ये ९३५ विमानांचं यशस्वी टेक ऑफ आणि लँडिंग करून या अगोदर हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
दररोज किती टेक आॅफ, लँडिंग?

मुंबई विमानतळावरुन दररोज ९०० हून अधिक विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतं. असं असलं तरी लवकरच मुंबई विमानतळावरून दररोज १ हजाराहून अधिक विमानं ये-जा करतील, असा विश्वास विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला.एक धावपट्टी, तरीही अचाट कामगिरी

खरं तर मुंबई विमानतळावर एकूण दोन धावपट्ट्या असल्या, तरी त्या एकमेकांना छेदून जातात. त्यामुळे एकावेळी एकाच धावपट्टीचा वापर करता येतो. या कारणामुळे मुंबई विमानतळाचा समावेश एकच धावपट्टी असलेल्या विमानतळांच्या यादीत होतो.इथंही आहे एकच धावपट्टी, पण...

मुंबई विमानतळासारखीच विमानतळे लंडन (गॅटविक, स्टॅन्स्टड विमानतळ), इस्तंबूलमध्ये (सबिहा गॉक्सन विमानतळ) आहेत. तसंच सॅन डिएगो (अमेरिका), फुकुओका (जपान) आणि जियामेन (चीन) या विमानतळांवरही एकच धावपट्टी आहे. पण या विमानतळांचा वापर मुख्य विमानतळांवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी केला जातो.

याशिवाय न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि दिल्ली या शहरांमधील विमानतळांवरील दोन किंवा अधिक धावपट्ट्यांवरुन एकाचवेळी विमानांचं लँडिंग किंवा टेक ऑफ केलं जातं.व्यस्त गॅटविक विमानतळ

परंतु यापैकी गॅटविक हे जगातील एकमात्र असं विमानतळ आहे, जिथं केवळ एकाच धावपट्टीवरून दर तासाला नियमितपणे ५० हून अधिक विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतं. या यादीत मुंबई गॅटविकनंतर दुसऱ्या क्रमांकावर कारण मुंबई विमानतळावरुन दर तासाला ५० हून अधिक विमानांची ये-जा होत असली, तरी त्यात गॅटविक विमानतळासारखी नियमितता नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा