• पोलिसांनी 'लोडर' बनून चोरांना पकडलं, कार्गोतील मोबाईलचोरांचा पर्दाफाश
SHARE

मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातून मागील अनेक दिवसांपासून सामान चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास कालांतराने गुन्हे शाखा १० कडे सोपावण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून विविध प्रकरणांचा पर्दाफाश करून या चोरीत सहभागी असलेल्या ३ जणांना ताब्यात घेतलं आहे.


मोबाईलच्या जागी साबण

मुंबई विमनतळावरील इंडिगो एअरलाइन्सच्या कार्गो विभागात हे तिन्ही आरोपी लोडर म्हणून काम करायचे. कार्गोत आलेल्या सामानातील मोठ्या किंमतीचे मोबाईल काढून त्या जागी साबणाची वडी ठेवून हे पळ काढायचे. मागील अनेक दिवसांपासून कंपनीकडे चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. सीसीटीव्हीत देखील या तिघांची चोरी दिसून येत नसल्यामुळे आरोपींना शोधणं जिकरीचं बनलं होतं.पोलिस बनले 'लोडर'

आरोपींना शोधण्यासाठी अखेर पोलिस ड्युटी करून लोडर म्हणून काही दिवस काम करू लागले. या तिघांच्या संशयित हालचालींवर पोलिस साध्या वेषात नजर ठेवून होते. त्यावेळी तिन्ही आरोपी इंडिगो एअर लाईन्सच्या कार्गोतील पार्सल फोडून मोबाईल कपड्यात लपवून 'वेअर हाऊस'मध्ये नेत असल्याचं त्यांना दिसलं. पोलिसांनी या तिघांना थांबवत त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल सापडले.


५३ मोबाईल चोरल्याची कबुली

चोरी करताना रंगेहात पकडण्यात आल्यावर या तिघांनीही चौकशीत आतापर्यंत ५३ मोबाईल चोरून विकल्याची कबुली पोलिसांना दिली. मागील दीड वर्षांपासून हे तिघे चोरी करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. हे तिघेहीजण चोरीचे मोबाईल बाहेर कमी किंमतीत विकत होते. चोरीचे हे सर्व मोबाईल पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या