Advertisement

दादर आणि गिरगाव चौपाटीनंतर आता नरिमन पॉईंट इथे व्ह्यूईंग डेक

दादरनंतर आता नरिमन पॉईंट इथं व्ह्यूईंग गॅलरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

दादर आणि गिरगाव चौपाटीनंतर आता नरिमन पॉईंट इथे व्ह्यूईंग डेक
SHARES

दादरनंतर आता नरिमन पॉईंट इथं व्ह्यूईंग डेकचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे नरिमन पॉईंट इथल्या समुद्राकडील शेवटच्या भागात सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे.

मात्र आता लवकरच या टोकाचे सुशोभिकरण केले जाणार असून मुंबईकरांना मुंबईतील तिसरी दर्शक गॅलरी नरीमन पॉइंट येथे उपलब्ध होणार आहे.

कोणतेही नवीन बांधकाम करण्यात येणार नसून आहे तोच भाग सुशोभित करण्यात येईल. पालिकेचा नियोजन विभाग या कामाची अंमलबजावणी करणार आहे. संपूर्ण ६० मीटर लांब अरुंद भूभाग सुरक्षित करण्यासह याठिकाणी रोषणाई, सीसीटीव्ही यंत्रणा असे बदल करण्यात येतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मरीन ड्राईव्हचा अर्धगोलाकार भूभाग नरीमन पॉईंट इथे संपतो, तो भाग म्हणजे मुंबईची खास ओळख. एनसीपीएच्या समोर असलेल्या या भागापर्यंत अनेक जण सकाळ संध्याकाळी चालण्यासाठी, धावण्यासाठी येतात.

याठिकाणी जमिनीचा अरुंद असा भाग समुद्रात शिरलेला आहे. हा खास वैशिष्टयपूर्ण असा भाग सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय असतो. अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही या ठिकाणी झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव हा भाग पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवेश बंद होता.

आता लवकरच तेथे सर्वसामान्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. हा भाग खुला करून त्याचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी दिली. या विभागातील आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहूल नार्वेकर यांनी या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला आहे.



हेही वाचा

मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू, 'हे' आहेत निर्बंध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा