लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालयं

 Ghatkopar
लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालयं

घाटकोपर - मुंबई हगणदारी मुक्त व्हावे यासाठी महापालिका सर्व स्तरावर प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय. त्याच धर्तीवर एम पूर्व विभाग परिसरामध्ये 12 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालयं बांधण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व शौचालये निशुल्क असणार असून, शौचालयाचे परिरक्षण आणि देखभाल महापालिकेद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिलीय. तसेच एम पूर्व विभागात अनेक ठिकाणी सशुल्क सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांचा वापर परिसरातील नागरिकांनी नियमितपणे करावा यासाठी पालिकेद्वारे विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आल्याचंही किलजे यांनी सांगितलंय. त्याचबरोबर 'प्री-कास्ट' पद्धतीचे सिमेंटचे शौचालय घाटकोपर, मानखुर्द लिंक रोड आणि देवनार क्षेपणभुमीच्या अॅप्रोच रोडच्या जंक्शनवर बसविण्यात आले आहेत. तर उर्वरित 5 ठिकाणी देखील लवकरच लहान मुलांसाठीची शौचालये बसविण्यात येणार आहेत. या 5 ठिकाणांमध्ये देवणार क्षेपणभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील परिसर, झाकीर हुसेननगर, रफिकनगर यांसारख्या परिसरांचा समावेश आहे.

Loading Comments