कुर्ल्यातलं शौचालय उठलं स्थानिकांच्या जिवावर?

 Naik Nagar
कुर्ल्यातलं शौचालय उठलं स्थानिकांच्या जिवावर?
कुर्ल्यातलं शौचालय उठलं स्थानिकांच्या जिवावर?
See all

कुर्ला - नाईकनगर येथील शौचालयाच्या दुरवस्थेमुळे तिथले रहिवासी त्रस्त झाले आहेत. शौचालयाचे बांधकाम खराब झाल्यामुळे स्थानिक जीव मुठीत घेऊन या शौचालयांचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे शौचालयाची पाईपलाईन फुटल्याने घाण नाल्यामध्ये जाते. त्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचाही सामना करावा लागतोय. दरम्यान, लवकरात लवकर रहिवाशांना नवीन शौचालय बांधून द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी इम्तियाज अली यांनी केली आहे. लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत वॉर्ड ऑफिसर यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments