अखेर शौचालयांचे बांधकाम सुरू

 wadala
अखेर शौचालयांचे बांधकाम सुरू
अखेर शौचालयांचे बांधकाम सुरू
See all

वडाळा - नगरसेविका ललिता यादव यांच्या हस्ते वडाळा संक्रमण शिबिरात शौचालयांच्या बांधकामाचा नारळ मंगळवारी वाढवण्यात आला. अनेक महिन्यांपासून या परिसरात शौचालयांचा अभाव होता. याबाबत स्थानिक नगरसेविका ललिता यादव यांच्याकडे रहिवाशांनी निवेदन दिलं होतं. त्यानुसार पालिकेकडे सातत्याने पाठपुरवा केल्यानंतर स्थानिक नगरसेविका ललिता यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं आहे.  संक्रमण शिबिरातील 3 हजार 600 झोपडपट्टीवासियांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तसंच बुधवारपासून 30 सीटर शौचालय बांधणीचे काम सुरु झालं असल्याची माहिती नगरसेविका ललिता यादव यांनी दिलीय. या वेळी काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष कचरू यादव, ब्लॉक अध्यक्ष मुराद अली मानकर यांच्यासह मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

Loading Comments