Advertisement

बीडीडीवरून काँग्रेसमधील 2 नेते आमने-सामने


बीडीडीवरून काँग्रेसमधील 2 नेते आमने-सामने
SHARES

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांवरून आता काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद चिघळला असून 2 नेते पुन्हा आमने-सामने आले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे प्रकल्पाच्या विरोधात तर, नायगाव-दादरचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर समर्थनार्थ एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकले आहे. आता तर डॉ. वाघमारे, कोळंबकर यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे आता हा वाद कोणते वळण घेतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखिल बीडीडी चाळ सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष म्हणून डॉ. वाघमारे प्रकल्पाविरोधात आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी डॉ. वाघमारे रहिवाशांसह रस्त्यावर उतरले. दुसरीकडे कोळंबकर मात्र सरकारच्या, म्हाडाच्या आणि प्रकल्पाच्या बाजूने असून हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे 17 मे रोजी बायोमेट्रिक सर्वेक्षण झाले, तेव्ही कोळंबकर विरूद्ध डॉ. वाघमारे असा काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच संघर्ष दिसून आला. आता हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

14 जुलै रोजी नव्याने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार होते. त्या दिवशीही डॉ. वाघमारे यांनी कोळंबकर यांनाच टार्गेट करत पक्षाचे प्रवक्ते असतानाही आपल्याच पक्षातील आमदाराविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे तर, कोळंबकर विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात निवेदनही दिले. आता तर थेट पक्षश्रेष्ठींकडे कोळंबकरांची तक्रार केल्याची माहिती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.


जीवे मारण्याची धमकी

या प्रकल्पाला विरोध करत असल्याने आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले आहे. याविषयी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार करत पोलिस संरक्षणाची मागणीही केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


कोळंबकर भाजपात जाणार

एकीकडे डॉ. वाघमारे विरूद्ध कोळंबकर असा वाद चिघळला असताना काँग्रेसमधूनच दबक्या आवाजात कोळंबकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. डॉ. वाघमारे यांनीही मुंबई लाइव्हशी बोलताना याला दुजोरा दिला आहे. कोळंबकर यांनी मात्र सध्या तरी असा कोणता विचार नसल्याचे म्हणत ही चर्चा खोटी ठरवली आहे.
मला जनतेने त्यांची कामे करुन देण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे जनतेची कामे करणे हे माझे कर्तव्य आहे म्हणतानाच भाजपात जाण्यासंबंधीचे पुसटशे संकेत दिले आहे.


मी गेल्या 20 वर्षांपासून बीडीडीचा प्रश्न मांडत आहे. बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लागावा हेच माझे आणि बीडीडीवासियांचे स्वप्न आहे. आता हे स्वप्न पूर्ण होत असताना त्यात अशा प्रकारे विनाकारण खोडा घातला जात आहे. जे खोडा घालत आहेत त्यांचे काही वैयक्तिक फायदे असून शकतात त्यात मला जायचे नाही. पण प्रकल्प व्हायला हवा आणि तो होणारच. राहिला प्रश्न माझ्यासंदर्भातील तक्रारीचा, मी कोणत्याही कारवाईसाठी तयार आहे.
- कालिदास कोळंबकर, आमदार, काँग्रेस

हेही वाचा -

बीडीडीचा पुनर्विकास आधीच्या सरकारच्या अनास्थेमुळेच रखडला - देवेंद्र फडणवीस


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा