मालवणीतील नाल्यात मातीचा भरणा

 Malad
मालवणीतील नाल्यात मातीचा भरणा

मालवणी - मालवणी गेट क्रमांक 8 येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात मातीचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा थांबल्याने डासांचा उपद्रव वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. नाला दुरुस्त करण्यात येणार होता मात्र रात्री-अपरात्री तेथे भरणा करण्यात येत आल्याची बाब स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणली. याबाबत पी उत्तर पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांना विचारले असता एक-दोन दिवसात पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं.

Loading Comments