उन्हाळा आला, पाण्यासाठी पळापळा

मुंबई - अपुरा पाणीपुरवठा ही मुंबईकरांसमोरची नेहमीची समस्या. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरातही पाण्यासाठी काही लोकांना नळावर लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. कधीकधी टॅँकरचा आधारही घ्यावा लागतो. मुंबईसारख्या शहरातील या अवस्थेविषयी मुंबईकरांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला. त्यावेळी जवळपास सर्वच लोकांनी या समस्येबाबत संताप व्यक्त केला. राजकारणी केवळ निवडणुकांपुरते येऊन आश्वासनं देतात आणि महापालिका प्रशासन तक्रारींची दखलही घेत नाही, अशी तक्रार यावेळी मुंबईतील महिलांनी बोलून दाखवली.

Loading Comments