Advertisement

Women’s Day Special: घरखरेदीत महिला आघाडीवर, मुंबईला देतात प्राधान्य!

मालमत्ता खरेदीतही महिला आता पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढू लागल्या आहेत. ‘एएनएराॅक- एलआयसी हाऊसिंग फायनांन्स कन्झ्युमर सेंटिमेंट सर्व्हेतून’ (anarock lic housing finance consumer sentiment survey) ही बाब समोर आली आहे.

Women’s Day Special: घरखरेदीत महिला आघाडीवर, मुंबईला देतात प्राधान्य!
SHARES

मालमत्ता खरेदीतही महिला आता पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढू लागल्या आहेत. ‘एएनएराॅक- एलआयसी हाऊसिंग फायनांन्स कन्झ्युमर सेंटिमेंट सर्व्हेतून’ (anarock lic housing finance consumer sentiment survey) ही बाब समोर आली आहे. पहिलं घर विकत घेणाऱ्यांमध्ये पुरूषांच्या पुढं महिलांनी झेप घेतली असून मालमत्ता बाजारपेठेतील (property market) खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये महिला खरेदीदारांचा टक्का यामुळे वाढत आहे. त्यातही घर खरेदीत महिला गृहखरेदीदार मुंबई महानगराला प्राधान्य देत असल्याचं हा सर्व्हे सांगतो. देशभरातील महिलांच्या सर्व्हेतून ही आकडेवारी समोर आली आहे.

घर खरेदी करणाऱ्या महिलांमध्ये ७७ टक्के महिला या एण्ड युजर्स म्हणजेच रहाण्यासाठी घर विकत घेणाऱ्या आहेत. तर २३ टक्के महिला केवळ गुंतवणूक म्हणून घर विकत घेणाऱ्या आहेत. त्यातही ८७ टक्के महिला आपलं पहिलं घर (first home buyers) घेणाऱ्या आहेत. या तुलनेत केवळ ६२ टक्केच पुरूष एण्ड युजर्स तर ३८ टक्के पुरूष गुंतवणुकीच्या उद्देशाने घर खरेदी करत आहेत. 

यासंदर्भात बोलताना एएनएराॅक प्राॅपर्टी कन्सल्टंटचे चेअरमन अनुज पुरी (anarock property consultant chairman anuj puri)  म्हणतात की, महिला गृहखरेदीदारांचं (womens home buyers) वाढतं प्रमाण नक्कीच उल्लेखनीय आहे. खासकरून शहरी भागात. घर खरेदी करताना पुरूषांप्रमाणेच महिला गृहखरेदीदार नोकरी-धंद्याच्या ठिकाणापासून जवळचं घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. हाऊसिंग प्रोजेक्टमधील चांगल्या सुख-सुविधा (amenities) महिलांसाठी (३५ टक्के) दुसऱ्या क्रमांकावर असून यातुलनेत पुरूष गृहखरेदीदारांना कमी किंमतीतलं मोठं घर आकर्षित करतं.  

तरूण महिलांमध्ये घर (womens home buyers) खरेदीचं जास्त आकर्षण असून २५ ते ३५ या वयोगटातील सर्वाधिक महिला (४७ टक्के) घर खरेदीसाठी पुढं येत असल्याचं हा सर्व्हे सांगतो.३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ४१ टक्के महिला घर खरेदीला प्राधान्य देत असून २५ वर्षांखालील महिला गृहखरेदीदारांचं प्रमाण ५ टक्के एवढं लक्षणीय आहे. यातुलनेत ४७ टक्के पुरूष गृहखरेदीदार ३५ ते ४५ या वयोगटातील आहेत. तर केवळ ३४ टक्के पुरूष गृहखरेदीदार २५ ते ३५ या वयादरम्यान घर खरेदी करत असल्याचं दिसतं.  

घर खरेदीदासाठी सर्वात आवडतं ठिकाण कोणतं? असा प्रश्न विचारल्यावर २६ टक्के महिलांनी मुंबई महानगराला (MMR) गृहखरेदीसाठी पसंती दिली. त्यापाठोपाठ एनसीआरला २२ टक्के, बंगळुरूला २० टक्के, पुणे १२ टक्के, कोलकाता ८ टक्के, चेन्नई ५ टक्के आणि हैदराबादला ३ टक्के महिलांनी पसंती दिली. त्याशिवाय टीअर २ आणि ३ मधील शहरांना ५ टक्के महिलांनी पसंती दिली.  

महिला गृहखरेदीदारांमधून ४० टक्के महिला मध्यम आकाराच्या ४५ ते ९० लाख रुपये किंमतीच्या घरांना प्राधान्य देत असल्याचं हा सर्व्हे सांगतो. तर ३५ टक्के महिलांना ४५ लाख रुपयांपर्यंतचं अफोर्डेबल घर खरेदी करणं जमतं असल्याचं यातून दिसतं. केवळ ३ टक्के महिला गृहखरेदीदारांचा कलच १.५ कोटी रुपयांवरील लक्झरिअस घर खरेदी करण्याकडे दिसून येतो. यातुलनेत १२ टक्के पुरूष दीड कोटींवरील घर खरेदी करतात. 

घर खरेदी करताना ५० टक्के महिला ८०० ते १२०० चौ.फुटांचं २ बीएचके आकाराचं घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तर केवळ १३ टक्के महिलाच ६०० चौ.फुटांच्या आतील २ बीएचके आकारच्या घरांना पसंती देतात.

घर खरेदी करतानासुद्धा ६० टक्के महिला ब्रँडेड डेव्हलपर्सनाच प्राधान्य देतात. त्यातही ६ महिन्यांच्या आत पूर्ण होणाल्या प्रकल्पांमध्ये घर घ्यायला ५६ टक्के महिला तयार होत असून २६ टक्के महिला १ वर्षांच्या आत बांधून तयार होणारं घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तर १८ टक्के महिला नवीन लाॅन्च झालेल्या प्रोजेक्टमध्ये घर घ्यायला तयार होतात.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा