Advertisement

बीच कबड्डीत अमर संदेश, विकास, साईराजची विजयी सलामी


बीच कबड्डीत अमर संदेश, विकास, साईराजची विजयी सलामी
SHARES

जुनी प्रभादेवी इथल्या अोम ज्ञानदीप मंडळातर्फे मुंबईत पहिल्यांदाच बीच कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सामन्यात अमर संदेशने प्रभादेवीच्या जयदत्त क्रीडा मंडळाला ४७-३० अशा फरकानं पराभूत केलं. अमर संदेशच्या विजयात अभिषेक पाल आणि दीप थर्वल यांचा मोलाचा वाटा होता. जयदत्तच्या सुरज चांदे याने प्रतिकार केला.


साईनाथची दुसऱ्या फेरीत मजल

दुसऱ्या सामन्यात २०-२० अशी बरोबरी असणाऱ्या साईनाथ ट्रस्टने सिद्धेश राऊतच्या चौफेर चढाया आणि सुरज आगटे, मयूर घंटेला यांची पकडीत मिळालेली साथ याच्या जोरावर यंग प्रभादेवीचा ४०-३५ असा ५ गुणांनी पराभव करून विजयी आगेकूच केली. यंग प्रभादेवीचे सौरभ पेटकर, सचिन यादव चमकले.


विकासचा सहज विजय

बलाढ्य विकास संघाने करी रोडच्या अशोक मंडळाला ४८-३२ अशा फरकाने नमवले. अवधूत शिंदे याचा अष्टपैलू खेळ आणि विराज सिंग व अजित पाटील यांची मिळालेली सुरेख साथ यांच्या बळावर विकासने विजय संपादन केला. पराभूत संघाकडून रोशन वोगणे, निखिल पवार बरे खेळले.


साईराजची १ गुणाने सरशी

शेवटच्या सामना अत्यंत चुरशीचा झाला. काळाचौकीच्या साईराजने प्रभादेवी स्पोर्टस क्लबचा ४०-३९ अशा नाममात्र १ गुणाने निसटता पराभव केला. मध्यंतराला सामना १९-१९ असा बरोबरीत होता. साईराजच्या तेजस चाळके आणि अनिकेत रामाने विजयाचे शिल्पकार ठरले. प्रभादेवी स्पोर्टस क्लबच्या हर्षल तेरवनकर आणि दर्शन पांचाळचे प्रयत्न निष्फळ ठरले.


हेही वाचा -

प्रभादेवीत वाळूवर रंगणार कबड्डीचा थरार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा