अंकुर व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, यूनियन बँकेची विजयी सलामी


SHARE

अंकुर स्पोर्टस अाणि डाॅ. शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या विद्यमाने अायोजित करण्यात अालेल्या पुरुषांच्या व्यावसायिक गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे अाणि यूनियन बँक या संघांनी विजयी सलामी दिली. कुमार गटात बंड्या मारुती, वारसलेन या संघांनी अागेकूच केली. लालबाग, गणेशगल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मध्य रेल्वेने मुंबई पोलीस संघाचे कडवे अाव्हान ३३-३० असे मोडून काढले. प्रो-कबड्डीतील स्टार खेळाडू श्रीकांत जाधव, मयुर शिवतरकर यांच्या झंझावाती चढाया अाणि सूरज बनसोडेच्या भक्कम बचावामुळे हा विजय शक्य झाला.


माझगाव डाॅकचा सहज पराभव

व्यावसायिक गटातील दुसऱ्या सामन्यात यूनियन बँकेने माझगाव डॉकचा प्रतिकार ४२-२२ असा सहज संपविला. यूनियन बँकेच्या नितीन घोगळे याने आपल्या एका चढाईत मोहरे टिपत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला अजिंक्य कापरेने चढाईत, अजिंक्य पवारने पकडीत मोलाची साथ दिली.


बंड्या मारुतीचा दणदणीत विजय

कुमार गटात बंड्या मारुतीने लक्ष्मीमाताचे आव्हान ४१-२५ असे संपुष्टात आणले. मध्यंतराला २४-१२ अशी भक्कम आघाडी विजयी संघाकडे होती. कार्तिक व गणेश हे पाटील बंधू बंड्या मारुतीकडून छान खेळले. दुसऱ्या सामन्यात, वारसलेनने सोहम नार्वेकर, प्रांजल पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर बारादेवीचा ३६-३३ असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली.


हेही वाचा -

अमरहिंद ठरला पिंपळेश्वर चषकाचा मानकरी

संबंधित विषय
ताज्या बातम्या