Advertisement

गोल्फादेवी, सिद्धिप्रभा, डॉ. आंबेडकर, प्रॉमिस संघ दुसऱ्या फेरीत


गोल्फादेवी, सिद्धिप्रभा, डॉ. आंबेडकर, प्रॉमिस संघ दुसऱ्या फेरीत
SHARES

हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त चंद्रोदय क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेची शुक्रवारी पहिली फेरी झाली. यात गोल्फादेवी, सिद्धिप्रभा, डॉ. आंबेडकर आणि प्रॉमिस या संघानी विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. हे सामने प्रभादेवी येथील मुरारी घाग येथील मैदानावर खेळवण्यात आले होते. 

मुलांच्या सामन्यात सिद्धिप्रभाने लोअर परेलच्या वंदे मातरम् चा चुरशीच्या लढतीत 48-42 असा पाडाव केला. पूर्वार्धात 27-22 अशी आघाडी घेणाऱ्या सिद्धिप्रभाला उत्तरार्धात मात्र कडव्या अशा प्रतिकाराला सामोरे जावे लागले. सिद्धिप्रभाकडून विवेक मोरे,ओमकार पवार तर वंदे मातरमकडून धनंजय कदम, अनिकेत यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत खेळ केला.

गोलफादेवीने साईराजला 40-06 असे धुवून काढले. मध्यांतराला 24-05 अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीने नंतर मागे वळून पाहिलेच नाही. मध्यांतरानंतर साईराज अवघा 1 गुण मिळवू शकले. शार्दुल हरचकर, धनंजय सरोज यांच्या झंझावती खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. डॉ.आंबेडकर स्पोर्ट्सने इच्छाशक्तीचा 40-13 असा धुव्वा केला. मध्यांतराला 22-09 अशी आघाडी घेणाऱ्या आंबेडकर संघाकडून ओंकार पिसाळ, निखिल कांबळे यांचा खेळ डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मिथिलेश जाधव मात्र एकाकी लढला. 

शेवटच्या सामन्यात प्रॉमिसने श्रीसाईला 47-28 असे पराभव केले. मध्यांतराला 26-15 असे वर्चस्व राखलेल्या प्रॉमिसने उत्तरार्धात देखील ते कायम राखले. प्रॉमिसच्या या विजयाचे श्रेय सुशांत शिंदे, आकाश कोलगे यांच्या नेत्रदीपक खेळाला जाते. साईकडून अथर्व मांडवकर,शार्दुल पाटील यांनी दिलेली लढत देखील उत्कृष्ट होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा