Advertisement

राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत जय बजरंग, सुरक्षा यांची विजयी सलामी


राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धेत जय बजरंग, सुरक्षा यांची विजयी सलामी
SHARES

लोअर परेल येथील स्व. गणेश गोताड क्रीडांगणावर श्रीसाई क्रीडा मंडळाने अायोजित केलेल्या कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय बजरंग क्रीडा मंडळ अाणि सुरक्षा या संघांनी विजयी सलामी दिली. जय बजरंगने मुंबई शहरच्या पिंपळेश्वर संघावर २८-२७ असा निसटता विजय मिळवत पहिल्या विजयाची नोंद केली. अखेरच्या चढाईत जय बजरंगच्या तीन खेळाडूंनी पिंपळेश्वरच्या चढाईपटूची 'सुपर कॅच' करत दोन गुण मिळवले अाणि एका गुणाने सामना जिंकला. मनू कथोरे, तुषार चौधरी यांच्या सुरेख चढाया अाणि सागल शेलारचा भक्कम बचाव यामुळे जय बजरंगने विजय मिळवला.


सुरक्षाला श्रीराम संघाचा कडवा प्रतिकार

मुंबई उपनगरच्या सुरक्षा संघाने पालघरच्या श्रीराम कबड्डी संघाचा ३५-३० असा पाडाव केला. मध्यंतराला सुरक्षाने १९-१५ अशी चार गुणांची अाघाडी घेतली होती. उत्तरार्धातही ही अाघाडी टिकविण्यासाठी त्यांनी सावध खेळ केला. हर्ष जाधव, अक्षय दोडका यांच्या उत्कृष्ट चढाया व सुबोध मानेच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते. श्रीरामकडून अविनाश पालथे, स्वप्निल लोखंडे, प्रकाश शेलार यांचा खेळ संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडला.


श्रीराम संघाचे संमिश्र यश

याच गटातील दुसऱ्या सामन्यात श्रीराम संघाने मुंबई शहरच्या न्यू परशुरामला ४१-२० असे पराभूत केले अाणि बाद फेरीच्या अाशा कायम ठेवल्या. मध्यंतराला न्यू परशुराम संघ एका गुणाने अाघाडीवर होता. उत्तरार्धात मात्र त्यांना खेळात सातत्य राखता अाले नाही. अविनाश पालथे, प्रशांत खेडेकर यांनी अाक्रमणाची धार तेज करत श्रीराम संघाला विजय मिळवून दिला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा