Advertisement

महामुंबई कबड्डी लीगमध्ये कांदिवली कोब्राजचा विजयाचा दुहेरी धमाका


महामुंबई कबड्डी लीगमध्ये कांदिवली कोब्राजचा विजयाचा दुहेरी धमाका
SHARES

नंदूरबारहून मुंबईत अालेल्या दादा अावाडने महामुंबई कबड्डी लीगचा दुसरा दिवस गाजवला. दादाच्या दादागिरीमुळे कुर्ला किंग्सने अापला दुसरा विजयच मिळवला नाही तर या स्पर्धेच्या जेतेपदासाठी अापण प्रबऴ दावेदार असल्याचे दाखवून दिले. कांदिवलीतील चारकोप येथे सुरू असलेल्या महामुंबई कबड्डी लीगमध्ये कुर्ला किंग्सने जावळी टायगर्सचा ३७-२१ असा धुव्वा उडवला. कांदिवली कोब्राजनेही दोन्ही लढतीत धमाकेदार विजयाची नोंद केली. अाधी डी अँड डी टायटन्सला ३६-३२ असे पाणी पाजल्यानंतर अंधेरी अार्मीचा २९-२२ असा पाडाव केला.


दादा अावाडच्या नाॅनस्टाॅप चढाया

सह्याद्री नगरात उभारलेल्या नामदेवराव कदम क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना सलग दुसऱ्या दिवशीही कबड्डीचा वेगवान नजराणा अनुभवता आला. दादा आवाडने नॉनस्टॉप चढाया करत जावळी टायगर्सच्या खेळाडूंच्या नाकात दम आणला. पहिल्या मिनिटापासून सुरू केलेला चढायांचा सिलसिला कुर्ला किंग्जसाठी दादाने शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राखला. एकूण २५ चढाया करणाऱ्या दादाची एकदाच पकड झाली तर त्याने चढायांचे १३ अाणि सुपर कॅचचे ३ गुण मिळवले.


कांदिवली कोब्राजचा विजयाचा श्रीगणेशा

रोहित पाष्टेच्या झंझावाती चढायांच्या जोरावर कांदिवली कोब्राजने विजयाचा श्रीगणेशा केला. त्यांनी प्रथम डी अँड डी टायनटन्सला नमवले. डी अँड डीकडून निनाद तावडे, अामीर धुमाळ आणि धीरज ध्वरवळे यांनी चढायांचा वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण किरण कदमने तो प्रयत्न वारंवार हाणून पाडला. त्याने ७ सर्वांगसुंदर पकडी करून आपल्या संघाला विजयासमीप नेऊन ठेवले. कांदिवली कोब्राजच्या रोहित पाष्टेला चढाईत एकट्या सुनील यादवची साथ लाभली.


अंधेरी अार्मीला हरवले

कांदिवली कोब्राजने आपल्या दुसऱ्या सामन्यात अंधेरी आर्मीला हरवले. मात्र ती आघाडी अवघ्या एका गुणाचीच होती. सावधपणे खेळणाऱ्या दोन्ही संघांचा गुणफलकही समान गतीनेच पुढे सरकत होता. सचिन पाष्टे आणि नामदेव इस्वलकर हळूहळू अंधेरी आर्मीची गुणसंख्या वाढवत होते तर कांदिवली कोब्राजकडून रोहित पाष्टे आणि सुनील यादव चढाया करीत होते. अखेर राजेश बैदूरने ३ वेळा सुपर कॅच करून मिळविलेल्या गुणांमुळे कांदिवली कोब्राजने ७ गुणांनी अाघाडी घेतली अाणि ती अखेरपर्यंत टिकवत २९-२२ असा विजय मिळवला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा