Advertisement

कांदिवलीत रंगणार महामुंबई कबड्डी लीगचा धमाका


कांदिवलीत रंगणार महामुंबई कबड्डी लीगचा धमाका
SHARES

गल्लीबोळातली असल्ल मराठमोळी कबड्डी प्रो-कबड्डीमुळे ग्लॅमरस झाली अाणि जागतिक स्तरावरही पोहोचली. महाराष्ट्राच्या खेळाडूंचं नाव प्रो कबड्डीत अभिमानानं घेतलं जावं तसंच राज्यातून दमदार जोरदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी मराठी मुलांनाही अापली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता नववर्षाला कांदिवलीत कबड्डीचा धमाका रंगणार अाहे. अभिनाव क्रीडा केंद्र अाणि अोएच मीडिया यांच्या अायोजनाखाली चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत १५ ते २१ जानेवारीदरम्यान महामुंबई कबड्डी लीगचा थरार रंगणार अाहे.


१२०० खेळाडूंमधून संघांची निवड

प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळविल्या जाणाऱ्या महामुंबई कबड्डी लीगच्या सहा संघांची निवड १२०० खेळाडूंमधून करण्यात येणार अाहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील १२०० खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात अाली, त्यातून १०० खेळाडूंची निवड करण्यात अाली अाहे. अाता त्यातूनच १२ खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील. प्रत्येक संघात ९ स्थानिक अाणि अन्य जिल्ह्यांतील ३ खेळाडूंचा समावेश असेल.


सहा मालक उचलणार खेळाडूंचा खर्च

प्रो-कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील अाणि तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळवली जाणार असून एकूण 17 सामने खेळले जातील. गटात अव्वल राहणाऱ्या पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना रंगेल.


लाखोंची बक्षीसे, दुचाकी

महामुंबई कबड्डी लीगच्या या धमाक्यात खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनूसार मानधन दिले जाणार आहे. विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. उपविजेत्या संघाला ७५ हजारांचे इनाम मिळवेल. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकी देऊन सन्मानित केले जाईल.


ग्लॅमरस लूक

महामुंबई कबड्डी स्पर्धेलाही ग्लॅमरस लूक दिला जाणार आहे. रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, अॅक्शनपॅक्ड मनोरंजनासह या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रो कबड्डीचे स्टारही हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे या लीगला प्रो कबड्डी स्टार रोहित कुमार आणि सिनेस्टार सुनील बर्वे हे ब्रॅण्ड अँबेसेडर म्हणून लाभले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा