Advertisement

आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलिसांची नाशिक आर्मीवर मात


आमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलिसांची नाशिक आर्मीवर मात
SHARES

पहिल्या डावातील पिछाडीनंतर महेश मकदूमने केलेल्या अफलातून चढाया आणि त्याला महेंद्र राजपूतची मिळालेली साथ, या जोरावर महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक आर्मीवर ३५-२२ अशी सहज मात करीत आमदार चषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वेने पुण्यातील आयकर संघाचा रोमहर्षक लढतीत ३०-२८ असा पाडाव करून उपांत्य फेरी गाठली. अाता सेमीफायनलमध्ये त्यांची गाठ महाराष्ट्र पोलिसांशी पडेल. पुण्याच्या बीईजीने एअर इंडियाचे कडवे आव्हान ३९-३७ असे परतावून लावले. भारत पेट्रोलियमने देना बँकेला ३२-२२ असे सहज हरवले. दुसरा उपांत्य सामना भारत पेट्रोलियम अाणि बीईजी यांच्यात रंगेल. 



महेश मकदूमचा बोलबाला

नाशिक आर्मीने नरेंदर आणि दर्शनच्या जोरावर पूर्वार्धात १३-११ अशी दोन गुणांची आघाडी घेतली होती. पण उत्तरार्धात महेश मकदूमने एकाच चढाईत टिपलेले चार गडी पोलिसांसाठी स्फूर्तीदायक ठरले. झटपट एकामागोमाग दोन लोण चढवत महाराष्ट्र पोलिसांनी हा सामना ३५-२२ असा सहज आपल्या खिशात घातला. महेशला महेंद्र राजपूत, सुलतान डांगे आणि बाजीराव होडगेनेही चांगली साथ दिली.



पैसा वसूल सामना

एअर इंडिया आणि बीईजी पुणे यांच्यातील सामना पैसा वसूल होता. या लढतीत एअर इंडियाला सिद्धार्थ देसाई आणि मोनू गोयतच्या चढायांमुळे २४-२० अशी आघाडी मिळाली. मध्यंतरानंतर एअर इंडिया ३०-२१ अशी पुढे असताना बीईजीच्या रंजीतने ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. एकेक गुण वसूल करत त्यांनी एअर इंडियाला गाठले आणि शेवटच्या दोन मिनिटांत ३९-३७ अशा गुणसंख्येसह त्यांनी अापले उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

श्रीकांतचा तुफानी खेळ

रेल्वेसाठी तूफानी खेळ करणाऱ्या श्रीकांत जाधवने आजही आपल्या तुफानाचा झटका आयकरला दिला. त्यामुळे मध्यंतराला मध्य रेल्वेकडे १९-११ अशी जबरदस्त आघाडी होती. उत्तरार्धात अक्षय जाधव आणि निलेश साळुंखेने कल्पक खेळ करीत पिछाडी भरून काढली. २५-२५ अशा बरोबरीनंतर श्रीकांतची एक वेगवान चढाई आयकरला चांगलीच महागात पडली. त्यामुळे हा सामना रेल्वेने ३०-२८ असा दोन गुणांनी जिंकला.

नितीन मदनेची जादू

सुरुवातीला संथ सुरू असलेल्या सामन्यात नितीन मदने याने अापल्या वेगवान चढायांनी रंग भरले. त्याच्या भन्नाट चढायांमुळे भारत पेट्रोलियमने २१-११ अशी अाघाडी घेतली होती. मात्र पंकज मोहितेने एका चढाईत तीन अाणि नंतर चार गडी बाद करत सामन्यात रंगत अाणली. अखेर मदने अाणि सुरिंदरने देना बँकेची कोंडी करत गुण वसूल केले. अखेर हा सामना भारत पेट्रोलियमने ३२-२० असा जिंकत उपांत्य फेरी निश्चित केली.


हेही वाचा -

नितीन देशमुख ठरला महिंद्रावर भारी, देना बँक बाद फेरीत

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा