Advertisement

मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कुर्ल्यात रंगणार


मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा कुर्ल्यात रंगणार
SHARES

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन अाणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे अायोजन करण्यात अाले अाहे. कुर्ला पूर्व येथील नेहरू नगरमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १९ ते २२ मार्चदरम्यान ही स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेत पुरुष अाणि महिला गटात प्रत्येकी १६ संघ एकमेकांशी झुंजणार अाहेत. पुरुष अाणि महिला गटातील संघांची प्रत्येकी चार गटात विभागणी करण्यात अाली असून सामने प्रथम साखळी अाणि नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्व सामने विद्युतझोतात खेळविण्यात येतील.


हे संघ सहभागी होणार

भारत पेट्रोलियम, एअर इंडिया, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, मध्य रेल्वे, सेंट्रल बँक, देना बँक, आयकर - पुणे, मुंबई बंदर, किंग्स बिल्डर, मुंबई महापालिका आदी संघ पुरुष गटात सहभागी होतील. महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग, शिव ओम्, अनिकेत-रत्नागिरी, चिपळूण स्पोर्टस, शिवशक्ती, अमरहिंद, मुंबई पोलीस, जय हनुमान कोल्हापूर, विश्वशांती पालघर, कर्नाळा स्पोर्टस हे संघ सहभागी होणार आहेत.


साडेचार लाखांची बक्षिसे

विजेतेपद पटकावणाऱ्या पुरुष अाणि महिला गटातील संघांना प्रत्येकी एक लाख रुपये अाणि महापौर चषक देऊन गौरवण्यात येईल. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या संघांना प्रत्येकी ५० हजार रुपये अाणि चषक देण्यात येईल. तसेच उपांत्य फेरीतील पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी २५ हजार रुपये अाणि चषक देण्यात येईल. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू १५ हजारांचा मानकरी ठरेल. स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू अाणि पकड करणाऱ्याला प्रत्येकी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा