Advertisement

उपनगरच्या रिशांक देवाडिगा, सायली जाधवकडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे नेतृत्व


उपनगरच्या रिशांक देवाडिगा, सायली जाधवकडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाचे नेतृत्व
SHARES

भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा राज्य कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली ३१ डिसेंबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात अाली. यावेळी दोन्ही कबड्डी संघाचे नेतृत्व करण्याचा मान प्रथमच मुंबई उपनगरला मिळाला अाहे. प्रो-कबड्डीतील स्टार खेळाडू रिशांक देवाडिगा अाणि अाशियाई कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी सायली जाधव यांच्याकडे महाराष्ट्राच्या पुरुष अाणि महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात अाली अाहे. राज्याच्या महिला संघात उपनगरच्या चार खेळाडूंनी स्थान मिळवले अाहे. सध्या महाराष्ट्राच्या संघाचा कराड येथे सराव सुरू असून ते २९ डिसेंबरला हैदराबादला रवाना होतील.



दरम्यान, महाराष्ट्राच्या पुरुष अाणि महिला संघाच्या कर्णधारपदाचा मान पहिल्यांदाच मुंबई उपनगरला मिळाल्याबद्दल मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गजानन किर्तीकर यांनी अानंद व्यक्त केला अाहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या अाहेत.


महाराष्ट्राचा पुरुष संघ - रिशांक देवाडिगा (कर्णधार, मुंबई उपनगर), विकास काळे, सिद्धार्थ देसाई व विराज लांडगे (पुणे), सचिन शिंगाडे व नितीन मदने (सांगली), गिरीश इरनाक व निलेश साळुंखे (ठाणे), तुषार पाटील व ऋतुराज कोरवी (कोल्हापूर), अजिंक्य कापरे (मुंबई शहर), रवी ढगे (जालना), प्रशिक्षक - डाॅ. माणिक राठोड (अौरंगाबाद)


महाराष्ट्राचा महिला संघ - सायली जाधव (कर्णधार), अभिलाषा म्हात्रे, कोमल देवकर, तेजस्वी पाटेकर (सर्व मुंबई उपनगर), सुवर्णा बारटक्के (मुंबई शहर), स्नेहल शिंदे, अाम्रपाली गलांडे व सायली केरीपाळे (पुणे), ललिता घरट (रत्नागिरी), पूजा के. पाटील (कोल्हापूर), पूजा अार. पाटील (पालघर), शुभांगी वाबळे (अहमदनगर), प्रशिक्षक - राजेश ढमढेरे (पुणे).


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा