शिवसह्याद्री कव्हर्स अंतिम फेरीत


  • शिवसह्याद्री कव्हर्स अंतिम फेरीत
SHARE

मुंबई सुपर लीग शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स संघाने आपले स्थान निश्चित केले. शिवसह्याद्रीच्या गणेश शिंदे व प्रथमेश वायंगणकर यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर संघाने व्हिबज्यॉर सेव्हन संघावर एका गुणाने विजय मिळवला.

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात सुरु असलेल्या साखळी सामन्यातील इतर सामन्यांत निमसाई लायटर्सने संकल्प प्रतिष्ठान टायगर्सचा 3 गुणांनी, तर आंबेकर प्रतिष्ठान फायटर्सने सहकारी भांडार अचिव्हर्सचा 38 गुणांनी पराभव केला.

शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स संघाने व्हिबज्यॉर सेव्हनची अपराजित राहण्याची मक्तेदारी मोडीत काढली. तर अष्टपैलू गणेश शिंदे व बचावपटू प्रथमेश वायंगणकर यांच्या अप्रतिम खेळामुळे शिवसह्याद्रीने पहिल्या डावात 27-15 अशी मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात चढाईपटू सूरज सुतार व भावेश पवार यांनी आक्रमक खेळ करूनही व्हिबज्यॉर सेव्हन संघाला 40-41 अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दुसऱ्या सामन्यात संकल्प प्रतिष्ठान टायगर्सने निमसाई लायटर्सविरुद्ध मध्यंतराला 27-16 अशी आघाडी घेतली होती. मात्र निमसाई लायटर्सचा मासूमअली सय्यद याने चौफेर चढाई करत 50-47 अशा विजयी फरकान सामना आपल्या बाजूने झुकवला.

 तसेच आंबेकर प्रतिष्ठान फायटर्सने सहकारी भांडार अचिव्हर्स संघावर 60-22 असा सहज विजय मिळवला. या सामन्यात आझाद केवट हा खेळाडू चमकला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या