Advertisement

शिवशक्तीची मावळी मंडळ चषकावर मोहोर


शिवशक्तीची मावळी मंडळ चषकावर मोहोर
SHARES

मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित ६७व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाचे जेतेपद पटकाविले. पुरुष गटात श्री समर्थ क्रीडा मंडळाने बाजी मारली. ठाण्यातील चरई नाका येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे संघ दोन्ही गटात अंतिम फेरीत पोहोचले होते. पण त्यांना दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शिवशक्तीची सोनाली शिंगरे महिलांमध्ये तर छत्रपतीचा विजय चव्हाण पुरुषांमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरला.


सोनाली शिंगटेच्या सर्वोत्तम चढाया

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने छत्रपती क्रीडा मंडळाचा ४९-१९ असा धुव्वा उडवत श्री मावळी मंडळ चषक व २५ हजारांचे पारितोषिक पटकावले. छत्रपतीच्या स्वप्ना साखळकरने एका चढाईत दोन गडी टिपत बरोबरी साघून दिली. त्यानंतर सोनाली शिंगटेने चढाईत गुण घेण्याचा सपाटा लावला. सोनालीच्या या झंझावाताने शिवशक्तीने चौथ्या मिनिटाला छत्रपतीवर लोण देत १४-०५ अशी आघाडी घेतली. अखेरीस ३० गुणांच्या फरकाने शिवशक्तीने हा सामना जिंकला.


पुरुषांमध्ये श्री समर्थ विजेते

पुरुषांमध्ये, श्री समर्थ क्रीडा मंडळाने छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचा ३४-१९ असा पाडाव करीत चषक अाणि ४१ हजार आपल्या खात्यात जमा केले. अजिंक्य पाटील अाणि सागर पाटील यांनी छत्रपती क्रीडा मंडळाला ५-० असे अाघाडीवर अाणले. पण उमेश म्हात्रे अाणि उमेश पाटील यांनी छत्रपतीवर लोण देत श्री समर्थला १७-०९ असे अाघाडीवर अाणले. त्यानंतर पुन्हा एकदा लोण देत समर्थने २७-१७ अशी आघाडी घेतली. उमेश म्हात्रेने या नंतर झंजावाती खेळ करीत श्री समर्थ क्रीडा मंडळाला १५ गुणांच्या फरकाने विजय संपादन केला.


हेही वाचा -

मावळी मंडळ स्पर्धेत विजय नवनाथ, शिवशक्ती उपांत्य फेरीत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा