मावळी मंडळ स्पर्धेत विजय नवनाथ, शिवशक्ती उपांत्य फेरीत


  • मावळी मंडळ स्पर्धेत विजय नवनाथ, शिवशक्ती उपांत्य फेरीत
SHARE

श्री मावळी मंडळ ठाणे आयोजित ६७ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुष गटात होतकरू मित्र मंडळ (ठाणे), श्री समर्थ क्रीडा मंडळ (कालवार, ठाणे), छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ (डोंबिवली) व विजय नवनाथ मंडळ (मुंबई शहर) या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात टागोर नगर मित्र मंडळ (मुंबई उपनगर), शिवशक्ती क्रीडा मंडळ (मुंबई शहर), अमर हिंद क्रीडा मंडळ (मुंबई शहर) व  छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ (डोंबिवली) या संघांनी उपांत्य फेरी गाठली. अमरहिंदचा सहज विजय

महिला गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई शहरच्या अमरहिंद क्रीडा मंडळाने नवी मुंबईच्या रा. फ. नाईक संघाचा २६-१८ असा ८ गुणांनी पराभव केला. अमरहिंदकडून तेजस्विनी पोटे व तेजश्री सारंग यांनी उत्कृष्ट चढाया करीत अापल्या संघाला विजय मिळवून दिला. रा. फ. नाईक संघाकडून दर्शना सणस व छाया कोळी यांनी सुंदर पकडी केल्या.गतविजेत्यांचं अाव्हान संपुष्टात

दोन वेळा मावळी मंडळ कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या ठाण्याच्या उजाला क्रीडा मंडळाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाने त्यांना ३२-२३ असे पराभूत केले. स्वप्नील पाटीलच्या उत्कृष्ट चढायांमुळे उजालाने सुरुवातीला अाघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात होतकरू मित्र मंडळाच्या जितू चव्हाण व अक्षय मकवाना यांनी संयमी खेळ करीत आपल्या संघाचा विजय निश्चित केला.


हेही वाचा -

महिंद्राचं अधिराज्य, मोसमातील पाचव्या जेतेपदाला गवसणी

संबंधित विषय
ताज्या बातम्या