Advertisement

महिंद्राचं अधिराज्य, मोसमातील पाचव्या जेतेपदाला गवसणी


महिंद्राचं अधिराज्य, मोसमातील पाचव्या जेतेपदाला गवसणी
SHARES

अंकुर स्पोर्टस क्लब व डॉ. शिरोडकर विचार अमृतधारा आयोजित व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत महिंद्राने विजेतेपदाचा मान पटकावला अाणि अापल्या विलास जाधव या दिग्गज कबड्डीपटूला ५०व्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली. महिंद्राचं हे या मोसमातील पाचवं तर मुंबईमधील तिसरं विजेतेपद ठरलं. महिंद्राने यूनियन बँकेचा कडवा प्रतिकार ३२-२५ असा मोडून काढत ५१ हजार रुपयांच्या पारितोषिकासह शिवसेना प्रमुखावर कब्जा केला.


महिंद्राचे दोन लोण

लालबाग, गणेशगल्ली येथे झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्रा संघ सुरुवातीला पिछाडीवर पडला होता. नवव्या मिनिटाला महिंद्रावर लोण देत यूनियन बँकेने ११-०४ अशी अाघाडी घेतली होती. मात्र १७व्या मिनिटाला लोणची परतफेड करत महिंद्राने १४-१४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर महिंद्राने अाणखी एक लोण देत २९-२१ अशी अाघाडी घेत अापलं विजेतेपद निश्चित केलं. महिंद्राकडून अभिषेक भोजने, स्वप्नील शिंदे यांनी सुरेख खेळ केला.


कुमारांमध्ये विजय बजरंगची बाजी

५५ किलो वजनी गटात विजय बजरंग व्यायाम शाळेने जय दत्तगुरुला ६९-४७ असे पराभूत करीत माँसाहेब चषक व २१ हजारांचे पारितोषिक पटकावले. विजय बजरंगने चौथ्या मिनिटालाच लोण देत अापला इरादा स्पष्ट केला. मध्यंतराला ३४-२६ अशी आघाडी विजय बजरंगकडे होती. विजय बजरंगने या सामन्यात दत्तगुरुवर एकूण ५ लोण चढवित जेतेपद पटकावले. गणेश तुपे, तेजस बुगडे यांचा खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.


हेही वाचा -

अंकुर कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, यूनियन बँक बाद फेरीत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा