Advertisement

सुनील स्पोर्ट्सने पटकावला 'हिंदू हृदयसम्राट कबड्डी चषक’


सुनील स्पोर्ट्सने पटकावला 'हिंदू हृदयसम्राट कबड्डी चषक’
SHARES

ताडदेव येथील अार्य नगरमधील अार्य मंडळाच्या क्रीडांगणावर रंगलेल्या प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत सुनील स्पोर्टसने शिवशक्ती संघाचा ३३-१७ असा धुव्वा उडवत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला हिंदू हृदयसम्राट चषक अाणि ८ हजारांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान सुनील स्पोर्टसच्या रोहन जाधवने पटकावला.


सुरुवातीपासूनच घेतली अाघाडी

सुरुवातीपासूनच अाक्रमक खेळ करत सुनीलने शिवशक्तीवर पहिला लोण देत अाघाडी घेतली. हळुहळु त्यांनी ती वाढवत नेली. मध्यंतराला १४-०५ अशी अाघाडी घेतल्यानंतर सुनीलने पुन्हा एकदा शिवशक्तीवर दुसरा लोण देत अापली अाघाडी भक्कम केली. सुनीलच्या शोएब मुल्लाने एकाच चढाईत चार गडी टिपत हा लोण देण्यात मोलाचा वाटा उचलला. शिवशक्तीकडून म्हणावा तसा प्रतिकार लाभला नाही. सुनीलच्या विजयात रोहन जाधव याने चढाईत तर चेतन गायकवाडने पकडीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सर्वोत्तम चढाईचा पुरस्कार शोएब मुल्लाने तर उत्तम क्षेत्ररक्षणाचे बक्षिस शिवशक्तीच्या दीपक शिंदेने पटकावले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा