विजय क्लब, जय भारतची उपांत्यपूर्व फेरीत धडक


SHARE

विजय क्लब, सिद्धीप्रभा, जय भारत अाणि यंग प्रभादेवी या संघांनी पिंपळेश्वर क्रीडा मंडळातर्फे आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. करिरोड येथील स. बा. पवार मार्गावरील पिंपळेश्वर क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावरील मॅटवर सुरू असलेल्या या
स्पर्धेत विजय क्लबने ओम ज्ञानदीपचा प्रतिकार ५३-२९ असा मोडीत काढला. विश्रांतीला २३-१५ अशी आघाडी घेणाऱ्या विजयने नंतरच्या डावात जोरदार आक्रमण करीत सामना एकतर्फी केला. सुधीर सिंग, सुरज साळवी यांना या विजयाचे श्रेय जाते.


सिद्धीप्रभाकडून डाॅ. अांबेडकर पराभूत

सिद्धीप्रभा डॉ.आंबेडकरचे कडवे आव्हान ३१-२७ असे भेदत उपांत्यपूर्व फेरी गाठली. विवेक मोरे, मिलिंद पवार यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सिद्धीप्रभाने पहिल्या डावात १७-११ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात आंबेडकरांच्या ऋतिक कांबळे, अभिजित बामणे याने सिध्दीप्रभाला विजयासाठी चांगलेच झुंजविले.


नवजवानने जय भारतला झुंजवले

जय भारतने नवजवानाला ४८-३५ असे नमवित आपली घोडदौड सुरू ठेवली. मात्र पहिल्या डावात २९-१९ अशी आघाडी घेणाऱ्या जय भारतला दुसऱ्या डावात नवजवानच्या चिवट प्रतिकाराला सामोरं जावं लागले. जय भारतकडून रोहन होघळकर, प्रजोत करमारे, तर नवं जवान कडून भूषण शिर्के, साहिल साळुंखे यांनी उत्कृष्ट खेळ केला.


हेही वाचा -

फुटबॉलचा हट्ट धरणाऱ्यांनी कबड्डी, खो-खोचाही विचार करावा : डॉ. सईदा खान

संबंधित विषय
ताज्या बातम्या