दसऱ्यासाठी दागिन्यांची धूम

Dadar , Mumbai  -  

दादर - दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक... हा शुभमुहूर्त साधून सोने खरेदीसाठी मुंबईत चांगलीच गर्दी होती. दादरमधली ज्वेलर्सची दुकानंही गर्दीनं फुलली होती. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा भाव 29 हजार 500 इतका होता. त्यामुळे अनेकांनी सोनं खरेदीचा आनंद लुटला.सोन्याला सोन्याचा दिवस आलेला पाहून विक्रेत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं. दसऱ्याच्या मुहुर्तावर नेहमीप्रमाणेच घर, वाहन खरेदीलाही ग्राहकांची पसंती होती

Loading Comments